-->

Ads

                   नाल्यात फेकलेल्या एका तासाच्या बाळाला मिळाले जीवनदान



   उल्हासनगर

  अवघ्या एका तासापूर्वी जन्मलेल्या अर्भक बाळाला काळ्या पिशवीत बांधून निर्दयी माता-पित्याने नाल्यात फेकले.त्याने जीव वाचवण्यासाठी फोडलेला टाहो नागरिकांनी ऐकल्याने या गोंडस बाळाला जीवनदान मिळाले.
सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास उल्हासनगर पालिका हद्दीतील वडोल गावातील एका नाल्यात काळ्या पिशवीत बांधून तासाभरापूर्वी जन्मलेल्या अर्भक बाळाला अज्ञात माता-पित्याने फेकले होते.नाल्याच्या कडेवरून जाणाऱ्या नागरिकांना नागरिकांना नाल्यातील काळ्या पिशवीतून लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला.तिथेच राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या शालीनी गायकवाड यांनी नागरिकांच्या मदतीने पिशवी बाहेर काढली.ती उघडल्यावर त्यात तासाभरापूर्वी जन्मलेले बाळ दिसल्यावर शालीनी गायकवाड यांनी अशोका फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी रगडे यांना फोन करून माहिती देताच रगडे यांनी वडोल गावात धाव घेतली.व त्वरित त्या बाळाला शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात नेले.डॉक्टरांनी अर्भकाची नाळ कापून त्याच्यावर तात्काळ उपचार केल्याने बाळाला जीवनदान मिळाले.
स्त्रीभ्रूणहत्या थांबवा अशी दिल्ली ते गल्ली पर्यंत जनजागृती केली जाते.तरीही असे संतापजनक प्रकार घडत आहे. सदर अज्ञात माता-पित्याची तक्रार पोलीस ठाण्यात केल्याची माहिती शिवाजी रगडे यांनी दिली.


उस्मान शाह, 

Post a Comment

0 Comments