…नाहीतर 31 डिसेंबरनंतर तुमच्या मोबाईलमधील व्हॉट्सअप बंद होणार
नवी दिल्ली | मेसेजिंग अॅप मध्ये सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सअॅपने एक नविन फीचर आणण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. पण 31 डिसेंबरनंतर जुन्या ऑपरेटिंग सिस्टीमला व्हॉट्सअप सपोर्ट करणार नाही.
‘नोकिया एस40’ या फोनमध्ये व्हॉट्सअप चालणार नाही. तसेच Android 2.3.7. आणि iOS7 या फोनमध्ये 1 फेब्रुवारी 2019 नंतर व्हॉट्सअप चालणार नाही. ही माहिती व्हॉट्सअप कंपनीने दिली आहे.
व्हॉट्सअपच्या आधीच्या निर्णयावरुन 31 डिसेंबर 2017 नंतर Windows Phone 8.0, ब्लॅकबेरी OS आणि ब्लॅकबेरी १० या मोबाईलमधील व्हॉट्सअप बंद केले आहे.
दरम्यान, काही फीचर्स केव्हाही बंद करण्यात येतील, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.
0 Comments