अंबरनाथ मध्ये वाहनचालकांची गैरसोय , २० लाखांपासून जास्त थकबाकी
अंबरनाथ : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या पुढाकाराने सुरु करण्यात आलेल्या पहिल्या पोलीस पेट्रोल पंपाला चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी अनेकदा इंडियन ऑइल ला पैसे भरण्यास विलंब होत असल्यामुळे पेट्रोल व डिझेल अभावी हा पेट्रोल पंप बंद करण्यात आला . दिवाळी पासून अंबरनाथ चा पोलीस पेट्रोल पंप बंद असल्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत आहे साधारण २० लाख रुपयांची थकबाकी असल्याने येथून पेट्रोल देणे बंद केले आहे. दोन वर्षापूर्वी अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या मागच्या बाजूस सुसज्ज पोलीस पेट्रोल पंप चालू करण्यात आले हे पेट्रोल पंप पोलिसांचीच मुले चालवत असून स्थानिक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे त्यावर नियंत्रण आहे . रेल्वे स्थानकापासून काही मिनिटाच्या अंतरावर तसेच कल्याण बदलापूर महामार्गालगत हा पोलीस पेट्रोल पंप सुरु करण्यात आला आहे.पेट्रोलपंप बंद असल्यामुळे वाहनचालकांची चांगलीच गैरसोय होत आहे .
0 Comments