-->

Ads

उरण शहरातील विमला तलाव गार्डन(साने गुरुजी बालोद्यान) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या पाठीमागे बसण्यासाठी असलेल्या एका कठडयावर सर्वसाधारणपणे 25 ते 30 या वयोगटातील महिला गोंधळ लेल्या अवस्थेत आढळून आली.
ती एकटी रडत होती तेंव्हा   उरण नगर परिषद कर्मचारी मधुकर भोईर, मंजा भाभी,वॉचमेन महेबुब आदि नगर परिषद कर्मचारी यांनी तिची चौकशी केली. चौकशी मध्ये एका दारूडया व्यक्तीने तिला बागेत सोडून गेल्याचे तिने सांगितले. तिने आपले नाव पूणिमा मजरम शैख असे सांगितले, रामपुर मुरशाबाद,कलकत्ता असे स्वतः चा तिने पत्ता सांगितला. तसेच मला 5 वर्षाचा एक मुलगाही आहे असे तिने सांगितले. चौकशी करताच तिच्या जवळ मोबाइल नव्हता मात्र एक फोन नंबर होता. तो फोन नंबर स्विच ऑफ दाखविले. बंगाली भाषेत बोलत असल्याने नगर परिषद कर्मचारी यांनी एका बंगाली माणसाला बोलावून तिची सर्व माहिती विचारुन घेतली. लगेच उपस्थित पत्रकार विठ्ठल ममताबादे यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर,गुन्हें विभाग वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल अहेर यांना कळविली.तसेच नगर परिषद कर्मचारी मधुकर भोईर,कर्मचारी महेबुब यांनी लगेच उरण पोलिस ठाणेला फोन करून महिला मिसिंग झाल्याची खबर कळविली.फोन करताच 15 ते 20 मिनीटात उरण पोलिस ठाण्याच्या दोन महिला पोलिस कर्मचारी यांनी येवून तिला पोलिस ठाणे मध्ये नेले.हरविलेल्या महीलेला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.सदर महीलेला कोणी आणून सोडले ? कोलकत्ता येथील महिला उरण मध्ये काय करत होती ? सदर महीलेला गार्डन मध्ये सोडून जाणारी व्यक्ति या महीलेचे कोणी नाते वाईक आहेत काय ? याचा तपास पोलिस कर्मचारी घेत आहेत.

Post a Comment

0 Comments