-->

Ads


अंबरनाथच्या जय भवानी पारंपारिक सेवा संस्थेच्या सार्वजनिक नवरात्र उत्सवात दांडीया रसिकांचा उदंड प्रतिसाद ...



अंबरनाथ : आपल्या गेल्या ३० वर्षांची परंपरा कायम राखत अंबरनाथच्या भवानी चौक खुंटवाली येथील जय भवानी पारंपारिक सेवा संस्थेच्या सार्वजनिक नवरात्र उत्सवात याही वर्षी दांडीया रसिकांनी गर्दी करत उत्साही प्रतिसाद दिला आहे. धार्मिक उत्सव  आणि समाजिक कार्यातून समाजात सलोखा राखण्यासाठी नेहमीच पुढाकार घेणारे अंबरनाथच्या जय भवानी पारंपारिक सेवा संस्थेचे अध्यक्ष अरविंद वाळेकर  हे गेली ३० वर्ष हा नवरात्र उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करत असतात. या उत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती , समाजप्रबोधन , स्वच्छता अभियान, समाजातील कर्तुत्ववान व्यक्त्तीमत्वांचा सत्कार यांसारखे उपक्रम देखील राबविले जातात . त्याचबरोबर स्थानिक कलावंतांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते.  

या उत्सवात मोठ-मोठे कलावंत त्याच बरोबर विविध क्षेत्रातील मान्यवर आपली उपस्थिती लावून मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देत असतात.  हजारोंच्या संख्येने लहान थोरांपासून तरुण तरुणीसह सारेच जण या या उत्सवात  सहभागी होत असतात.  दांडियाच्या या जल्लोषासोबतच सामाजिक भान जपण्याचे कामही शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर आणि त्यांचे सहकारी करत असतात . त्याचप्रमाणे विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नऊ कर्तृत्ववान महिलांचा  नवदुर्गा म्हणून संबोधित करून  सत्कार देखील  करण्यात येतो . गरबा आणि दांडियासोबतच या उत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे उत्सवातील  सातव्या रात्री  देवीचा जागर म्हणून गोंधळ आयोजित केला जातो. या गोंधळ जागरणात लहानथोरांपासून सर्वचजण भक्ती-भावाने सहभागी होत असतात .परंपरा – संस्कृती त्यातून साधले जाणारे समाजप्रबोधन आणि कमालीची शिस्तप्रियता यामुळेच अंबरनाथचा जय भवानी पारंपारिक सेवा संस्थेचा हा  सार्वजनिक नवरात्र उत्सव लोकप्रिय होत चालला आहे.



Post a Comment

0 Comments