-->

Ads


पोलिस स्मृतीदिनाचे औचित्य साधत
लोकल बोर्ड स्कूलच्या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.

अंबरनाथ : पोलिस दलात आपले कर्तव्य बजावत असताना प्राणाची आहुती देणा-या देशातील सर्व पोलिस आणि निमलष्करी जवानांच्या स्मृतीप्रीत्यर्थ २१ ओक्टोंबर हा दिवस पोलिस स्मृतीदिन म्हणून पाळत श्रद्धांजली देण्यात येते.
 अंबरनाथमध्येही या दिनाचे औचित्य साधत ठाणे पोलिस आयुक्तालय परिमंडळ ४ उल्हासनगर अंतर्गत अंबरनाथ पोलिस स्टेशनच्यावतीने  लोकल बोर्ड स्कूलच्या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले . यावेळी सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील पाटील आणि वरिष्ठ पोलिस नि.काशिनाथ चव्हाण यांनी विद्यार्थ्यांशी गप्पांच्या माध्यमातून संवाद साधला . शाळेत येता जाताना आपल्या  सुरक्षेच्या दृष्टीने आपली काळजी  आपण कशी घ्यावी याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  शाळेच्या मुख्यध्यापिका , शिक्षक वर्ग तसेच अंबरनाथ  मुस्लीम कमिटीचे  अबीद मुस्ताक अली यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments