-->

Ads


अखिल भारतीय सेना व रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न


टिटवाळा : अखिल भारतीय सेना व रेड स्वस्तिक सोसायटी, ठाणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार  दिनांक १४/१०/१८ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळात हरिशचंद्र निवास, पोस्ट ऑफिस समोर,टिटवाळा(प) येथे रक्तदान ,मोफत नेत्र तपासणी,जीर्ण व्याधी आजार,लहान मुलांची तपासणी,दाताचे विकार, स्त्री रोग तपासणीचे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिराचा परिसरातील जेष्ठ नागरिक,महिला, लहान मुले, तरुणांनी लाभ घेतला. 

या शिबिरास डॉ. योगेश कवठे, अध्यक्ष टिटवाळा डॉक्टर वेलफेअर असोसिएशन,लक्ष्मण पाटील, अध्यक्ष कृष्णाई गोविंदा पथक,योगेश पाटील, संस्थापक गणगर्जना ढोल ताशा पथक यांची विशेष उपस्थिती लाभली. शिबिरासाठी मध्यवर्ती रुग्णालय,उल्हासनगर ३,डॉ राममूर्ती वर्मा,डॉ संजीव मिश्रा , डॉ तुषार गरुड,डॉ प्रभा हिर्देश पाल यांचे सहकार्य लाभले.

आरोग्य शिबिराचे सौ रंजना हनुमान पाटील, महिला अध्यक्ष, अखिल भारतीय सेना व प्रमोद नांदगावकर,राज्य जनसंपर्क संचालक, रेड स्वस्तिक सोसायटी, महाराष्ट्र राज्य यांनी नियोजनबद्ध आयोजन केले होते. शिबीर यशस्वी करण्यासाठी रुपेश  पाटील,अतिश पाटील, राकेश पाटील,योगेश पाटील, निलेश खर्चे,साहिल पाटील, योगेश खर्चे,धृव पाटील, अनिल गावंडे, गुलाब बागेल व इतर सर्व कार्यकर्त्यांनी अथक मेहनत घेतली.


Post a Comment

0 Comments