अंबरनाथमध्ये नशाकारक
औषधी द्रव्ये अनधिकृतपणे विकून तरुणांना व्यसनाच्या जाळ्यात ओढणाऱ्या टोळीला अटक
अंबरनाथ : अंबरनाथ
परिसरातील अल्पवयीन मुले, तरुण यांना नशकारक औषधी द्रव्ये , अनधिकृतपणे विक्री होत
असून येथील तरुण पिढी व्यसनाधीन होत असल्याची माहीती अंबरनाथ पोलिसांना प्राप्त
झाल्यानंतर दिनांक ११ ऑक्टोबर रोजी बनावट
ग्राहक बनून पोलिसांनी औषध प्रशासन
विभागाच्या अधिकाऱ्यांसह सापळा लावून कैलाश नगर येथून रुक्साना कासीम शेख आणि तिची
साथीदार महिला सईदा युसुफ शेख हिला नशा आणि
गुंगी आणणाऱ्या गोळ्या ज्याला नशेखोरांच्या भाषेत बटन असे म्हणतात त्या गोळ्या आणि
द्र्व्यांसह अटक केली आहे. या जप्त केलेल्या औषधांची किंमत बाजारमूल्याप्रमाणे जरी
३३०००/- असली तरी ती लाखो रुपयांपर्यंत विकली गेली असती. या बेकायदा धंद्यात सईदा
हिचा नवरा युसुफ शेख उर्फ ढेप्या हा देखील सामील आहे.
अटक केलेली महिला ही
सराईत गुन्हेगार असून तिच्यावर खुनाच्या प्रयत्नासारखे गुन्हे नोंद आहेत . मुंब्रा पोलीस स्टेशनमध्येही तिच्यावर गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात
आली.
0 Comments